शिरुड ग्रामपंचायत उपसरपंचपदी अरुणाबाई पारधी बिनविरोध
धुळे (स्वप्निल मराठे) तालुक्यातील शिरुड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुणाबाई बापू पारधी यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या ग्रामपंचायतीवर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे वर्चस्व आहे.
शिरुड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंचांनी राजीनामा दिल्याने सदर जागा रिक्त झाली होती. उपसरपंच पदासाठी नकतीच ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत अरुणाबाई बापू पारधी यांची उपसरपंचपदी निवड झाली. यावेळी सरपंच गुलाबराव कोतेकर, ग्रामविकास अधिकारी भूपेंद्र ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य रुखमाबाई चव्हाण, सरलाबाई शेजवळ, सुरेश कोढे, कलाबाई पवार, वंदनाबाई गायकवाड, योगेश गायकवाड, विलास पाटील, नाना मोरे, मनीषाबाई सोननीस, भैय्या खैरनार, योगेश काळे उपस्थित होते.
शिरुड येथे उपसरपंचपदी अरुणाबाई पारधी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सरपंच गुलाबराव कोतेकर व अन्यग्राम पंचायत सदस्य, निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीत ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच अरुणाबाई पारधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदमाकर पाटील, राहुल मराठे, पंढरीनाथ पाटील, नंदू पाटील, धीरज बच्छाव, काशिनाथ भोई, दीपक पाटील, नाना शिंदे, अभिमन सोननीस, भुरा पवार, किशोर पवार, अतीष पाटील, डिगंबर पाटील आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच अरुणाबाई पवार यांचे माजी मंत्री रोहिदास पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी कौतक केले आहे.