चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढी लि. ची पंचवार्षिक निवडणूक (२०२२-२०२६) उत्साहात पडली पार
चोपडा (विश्वास वाडे) तालुक्यातील शिक्षक श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखालील सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी ही लढत झाली. यात सहकार पॅनलने ११ पैकी ९ जागा जिंकत बाजी मारली.
सहकार पॅनलच्या बाविस्कर दिनेश नारायण, वाघ गुणवंत बाबुराव, महाजन संजय पुरुषोत्तम, पाटील राजेंद्र सुरेश, पाटील सुभाष वामन, चौधरी सुनील देविदास, पावरा वंदना सरदार, शिंदे सुनंदा रघुनाथ, प्रदीप काशिनाथ यांनी विजय मिळवला तर परिवर्तन पॅनलच्या पाटील संजय हरी व वारडे हिलाल यशवंत या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. जिल्हा परिषद शाळा क्र. १ येथील दोन मतदान केंद्रावर दि. १२ रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात आले. ४८८ पैकी ४७४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदार संघ निहाय मिळालेली मते खालीलप्रमाणे :
सर्वसाधारण मतदार संघ –
बाविस्कर दिनेश नारायण (२७८), वाघ गुणवंत बाबुराव (२७८), महाजन संजय पुरुषोत्तम (२५०), पाटील राजेंद्र सुरेश (२४४), पाटील संजय हरी (२३९), पाटील सुभाष वामन (२३४), चव्हाण अतुल शांताराम (२१७), चौधरी निलेश नामदेव (२०१), पाटील सुनील लोटन (२२३), पाटील सुनील प्रताप (२२२), राजपुत नवनीत माधवराव (२२२), बाद मते – १०
महिला राखीव मतदार संघ –
पावरा वंदना सरदार (२५८), शिंदे सुनंदा रघुनाथ (२४४), पाटील अनिता केशवराव (२३०), वारडे सुनंदा पुंडलिक (१५२), बाद मते – अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ –
वारडे हिलाल यशवंत (२४३), मोरे रोहिदास त्र्यंबक (२०३), पारधी अमृत शंकर (२४), बाद मते – ४
इतर मागासवर्गीय मतदार संघ –
चौधरी सुनील देविदास (२६४), महाजन चैत्राम सुका (२१०)
भटक्या विमुक्त जाती/वि.मा. प्र. प्रवर्ग मतदार संघ –
न्हायदे प्रदीप काशिनाथ (२५३), सोनवणे संजय रामदास (२१५), बाद मते – ६
सहकार पॅनलचे प्रमुख ज्येष्ठ निवृत्त शिक्षक आर. एच. बाविस्कर, निवृत्त मुख्याध्यापक टी. एम. चौधरी, पतपेढीचे माजी चेअरमन व्ही. पी. चौधरी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने हा विजय साकारला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी के. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. पुरोहित, संजय पाटील, गटसचिव एस एफ पाटील, सुनील सोनवणे, राजू बोरसे, रवींद्र पाटील, साहेबराव पाटील, कृष्णराव पाटील, हिम्मत पाटील, नारायण पाटील, नंदू पाटील, सदासींग बरेला, योगेश पाटील, विजय पाटील , पोलीस शिपाई योगेश शिंदे, मनोज पारधी यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.