महाराष्ट्र
गोळवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला जे पी गायकवाड यांनी दिली भेट
वैजापूर (प्रतिनिधी) गोळवाडी मध्ये चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने वैजापुर तालुक्याचे कृषी अकाउंट ऑफिसर जे पी गायकवाड यांनी भेट दिली आहे. अखंड हरिनाम सप्ताह मध्ये वैष्णव महाराज यांच्या अमृतवाणीतून गोळवाडी ग्रामस्थ कथेचे श्रवण करत आहे व चार ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ चालू असतो हरिपाठाचे सूत्रसंचालन ह.भ.प. पांडुरंग महाराज करत आहे व रोजच्या रोज अन्नदान व पंगती होत आहे. हरिभक्त पारायण वैष्णव महाराज यांनी कथेतून लोकांना उपदेश दिला. भागवत कथा ऐकल्यानंतर ती आपल्या आचरणात आणा त्यांनी आपला व देशाचा उद्धार होईल समस्त गावकरी.