गुन्हेगारी
मोटारसायकल चोरीचे प्रकार पुन्हा सुरू, पोलीसांनी लक्ष घालावे ; मालपुर ग्रामस्थांची मागणी
मालपुर (गोपाल कोळी) शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे काल रात्री गावातुन M.H. 18 BF 9797 हि मोटारसायकल चोरीस गेली होती. परंतु, गावाच्या बाहेर अमरधाम येथे ही गाडी सकाळी शेतात जाणारे शेतकऱ्यांना आढळली व त्या गाडीमध्ये पेट्रोल संपलेले होते म्हणुन ती गाडी वाचली नाहीतर ती गाडी चोरट्यांनी तिथून लंपास केली असती.

एक महिन्यापासुन हे सत्र बंद झाले होते. तरी परत मालपुर गावात चोरीचे प्रमाण वाढले आहे. तरी दोंडाईचा पोलीस स्टेशनने मालपुर हे गाव 7 किलोमीटर अंतरावर आहे. तरी गावात रात्रीचे पेट्रोलींग सुरू करण्यात यावी व आरोपींन वर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मालपुर ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे.


