डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मंथन युवा प्रतिष्ठानतर्फे 1.31 लाख रोपांचे मोफत वाटप

शहापूर (देविदास भोईर) वाढते तापमान लक्षात घेऊन वृक्षरोन करणे ही काळाची गरज बनलेली आहे. तसेच केवळ वृक्षरोपन करून चालणार नाही तर वृक्ष संवर्धन ,वृक्ष सांघोपन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन मंथन युवा प्रतिष्ठान, वासिंद आणि टेराकॉन एनबीटेक संस्था या संस्थे च्या वतीने भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून 1.31 लाख फळ झाडे, औषधी झाडे आणि जंगली झाडे मोफत वाटप करण्यासाठी योजिले आहे.
या रोपांचे वाटप इच्छुक शेतकरी, पर्यावरण प्रेमी, संस्था, महिला मंडळ यांना करणार असून या रोपांचे लागवड, देखभाल आणि संगोपन कसे करावे याचे देखील मोफत प्रशिक्षण देणार आहे. याची नाव नोदणी 14 एप्रिल 2022 जून महिन्यात या रोपांचे लागवडी साठी संस्थेमार्फत देण्यात येणार आहेत. सध्या हे शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यात प्रायोगिक तत्वावर करणार असून येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी याची माहिती जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी आणि याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गणेश गुरूनाथ गायकवाड यांनी केले आहे. तसेच याविषयी अधिक माहितीसाठी 8369697131 या नंबर वर संपर्क करू शकता.