कासारे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत खेळणी साहित्यांचे उदघाटन
कासारे (प्रतिनिधी) जिल्हा परिषद केंद्र शाळा कासारे येथील मुलांची, मुलींची व उर्दू या तीनही शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडांगण खेळांची आवड निर्माण व्हावी म्हणून ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग निधीतून सुमारे २ लाख रुपये खर्च करून खेळणी साहित्य बसविण्यात आले. त्याचे उदघाटन करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच विशाल बापू देसले यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सोबत ग्रामपंचायत सदस्य बाळा खैरनार, दिपक देसले उपस्थित होते.
मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शाळा कर्मचारी यांच्याकडून कार्यक्रम प्रसंगी सरपंच विशाल बापू यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. सरपंच विशाल बापू यांनी आपल्या मनोगतुन कासारे जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवून विध्यार्थी इंग्रजी माध्यमाकडे न वळता मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी आग्रही असले पाहिजे. अशी आपली शाळा सुसज्ज आणि सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न आहे व येत्या काळात विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुध्द पाण्याचे मशीन बसविण्यात येईल व स्वतंत्र संगणक कक्ष सुरू करण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमानंतर सरपंच विशाल बापू यांनी विद्यार्थ्यांबरोबर खेळणी साहित्यवर खेळण्याचा आनंद घेतला.