अमळनेर
‘यूपीएससी’च्या सीडिएस परीक्षेत तुषार पाटील देशातून ७२ वा
अमळनेर (प्रतिनिधी) भारत सरकारने यूपीएससी मार्फत घेतलेल्या सीडिएस परीक्षेचा निकाल २४ डिसेंबर जाहीर झाला. या परीक्षेत अमळनेर तालुक्यातील रंजाने येथील तुषार मच्छिंद्र पाटील याने दैदीप्यमान यश संपादन केले. इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये देशात 72 वा तर भारतीय नौदलात ४२ क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे तुषार याला भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी विराजमान होऊन देश सेवेसाठी उच्चपदावर कर्तव्य बजावण्याची संधी प्राप्त झाली आहे.
तुषारने पाहिल्याच प्रयत्नात वयाच्या २१ व्या वर्षी हे यश प्राप्त केले असून त्यामुळे त्याचे सर्वत्र त्याचे कौतुक आहे व अमळनेरचे नाव देशात उंचावलेले आहे. तुषारचे वडील मच्छिंद्र पाटील हे देखील सिआरपीएफ दलात सब इन्स्पेक्टर म्हणुन जम्मू काश्मीर येथे देश सेवा बजावत आहे. तुषार हा माजी जिल्हा परिषद सदस्य अँड. व्ही. आर .पाटील. यांचा नातू आहे.