शिंदखेडा येथील एकविरा काॅलनीतर्फे गजानन महाराज प्रकटदिनी पालखी शोभायात्रा व महाप्रसाद म्हणून पिठले भाकर वाटप
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील एकविरा काॅलनी च्या वतीने गजानन महाराज ट्रस्टतर्फ सालाबादाप्रमाणे शहरात गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. हे आठवे वर्ष असून हयावर्षी मोठया उत्साहात तरुण महिला ट्रस्ट च्या पदाधिकारी सहभागी झाले. शहरातुन भव्य गजानन महाराज पालखी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत वाजतगाजत मनमुराद आनंद लुटला. घरोघरी महिलानी आकर्षक रांगोळी काढुन पालखीचे स्वागत केले. त्यानंतर महाप्रसाद म्हणून गजानन महाराजांचे आवडते भोजन पिठले व भाकर वाटप करण्यात आले.
गजानन महाराज ट्रस्ट च्या माध्यमातून एकविरा काॅलनी त गजानन महाराजांचे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे.दररोज नित्यनियम पुजा होते.मागील कोरोणा काळ वगळता प्रकटदिनी पालखी सोहळा व महाप्रसाद वाटप दरवर्षी राबविण्यात येत आहे.हे मंडळाचे आठवे वर्ष असून काॅलनी एकोप्याने हा उत्सव साजरा करतात असे ट्रस्ट चे मनोहर राजुरकर धात्रक यांनी सांगितले.हयावेळी ट्रस्टचे विश्वस्त अशोक मराठे , मनोहर राजुरकर, विठ्ठल गीर गोसावी , सुनील पिंपळीसकर , वामन बोरसे. रमेश चौधरी, जितेंद्र बाविस्कर, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले.सदर सोहळ्यात एकविरा काॅलनी व शहरातील महिला ,तरुण , ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.