नवीन वर्षाच्या सुरुवातीला भुसावळ उपविभागातील पोलिसांकडून तळिरामांवर कारवाई.
भुसावळ-अखिलेशकुमार धिमान

दिनांक: ०२ जानेवारी २०२३
भुसावळ: दिनांक ३१ डिसेंबर २०२२ चे रात्री ९:०० ते दिनांक ०१ जानेवारी २०२३ चे पहाटे २:०० वाजेपर्यंत भुसावळ उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण उपविभागामध्ये पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आलेला होता. एकूण ७ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. त्याशिवाय पोलीस पेट्रोलिंग व फिक्स पॉईंट लावण्यात आलेले होते.
सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षाचे स्वागत हे आनंदाने व उत्साहाने करता यावे,नवीन वर्षाच्या स्वागताला कोणताही अनुचित प्रकार घडू नये,मद्यपी लोकांकडून गालबोट लागू नये, नशा केलेल्या मद्यपी चालकांकडून रस्त्यावर अपघात होऊ नये, महिला मुलींची छेडछाड होऊ नये या दृष्टीने हा संपूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
कारवाईदरम्यान पोलिसांना ४९ वाहन चालक दारूच्या नशेत वाहन चालवताना मिळून आले.अशा वाहन चालकांवर पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार ड्रंक अँड ड्राईव्हची या शिवाय ३ अल्पवयीन मुलं नशेत गाडी चालवताना मिळून आले. त्यांची वाहने भुसावळ शहर वाहतूक शाखेमध्ये डिटेन करण्यात आलेली आहे. त्यांच्या पालकांवर कारवाई करून न्यायालयात खटला पाठवण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ खाली १३ व्यक्तींवर कारवाई करण्यात आलेली आहे.त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ट्रिपल सीट,विना नंबर प्लेट वाहन चालक, रैश ड्राईवहिंग करणारे वाहन चालक अशा वेगवेगळ्या ९७ व्यक्तींवर मोटार वाहन कायद्याखाली या कारवाईदरम्यान कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलिसांच्या या सक्त भूमिकेमुळे संपूर्ण उपविभागामध्ये नवीन वर्षाचे स्वागत व शुभारंभ कोणताही अनुचित प्रकार न घडता झालेला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक पडघन, पोलीस निरीक्षक गायकवाड,पोलीस निरीक्षक शेंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंटला,सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये, सहायक पोलीस निरीक्षक वानखेडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार,यांनी व पोलीस स्टेशन बाजारपेठ, पोलीस स्टेशन शहर, पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा भुसावळ यांच्या सर्व अंमलदारांनी केलेली आहे.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg
http://www.speednewsmahaeashtra.com