नाशिकच्या मुंबई नाका परीसरात बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ
नाशिक (मनोज साठे) नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशन लगत असलेल्या बिल्डिंगमधील बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गाळेधारकाकडे विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. जवळपास पंधरा वर्षापासून गाळे बंद असल्याचा गाळा मालकाने दावा केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मेडिकल शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात त्याचं पद्धतीने हे अवयव संकलन केलेले दिसले
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुंबई नाका येथील एका सोसायटीच्या बंद गाळ्यामध्ये मानवी अवयव सापडले आहेत. वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान असे वेगवेगळे मानवी अवयव ठेवण्यात आले आहेत. तर बादलीमध्ये देखील केमिकल प्रक्रिया करून मानवी अवशेष ठेवले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून आपण गाळे उघडले नाहीत, त्यामुळे आपल्याला काहीच माहित नसल्याचे गाळे मालकाने पोलिसांना सांगितले. गाळा मालकाच्या म्हणण्यानुसार पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी या गाळ्यामध्ये स्थायिक होते. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.