बोरशेती कळंभे ग्रुप ग्रामपंचायतची मंजूर केलेली काही सं$स कागदावरच
कळंभे (प्रतिनिधी) मोदी सरकाच्या स्वच्छ भारत मिशन या महत्वकांक्षी योजनेला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कागदावरच रेखाटले असल्याचे दिसत आहे. एका बाजूला सरकार घर घर सौचालय देण्याचे कार्य करत आहे तर दुसऱ्या बाजूला तेच लोकं उघड्यावर सौच करण्यास मजबूर झाले आहेत.
बोरशेती – कळंभे ग्रुप ग्रामपंचायत मधील २०१५-१६ ४१ लाभार्थी आणि २०१६_१७ मधील एकूण २८९ लाभार्थ्यांना लाभ दिलेले आहे. परंतु त्या लाभार्थ्यांन मध्ये शासकीय नौकरांची नावे असल्याचे दिसत आहे. आणि असे काही लाभार्थी आहेत की, ज्यांचा घरी प्रत्यक्षात सौचालय बांधलेले नसताना त्यांना लाभ दिल्याचे कागदोपत्री दिसून आले आहे. ग्रामपंचायत चा भोंगळ कारभारचा वेळोवेळी फज्जा उडाला आहे. सद्यस्थितीत कचरा, सांडपाणी आणि वीज कपात याचे मोठे संकट नागरिकांवर ओढवले आहे. उघड्यावर असलेल्या गटारी, गटारीचे कमकुवत केलेल्या कामामुळे सद्यस्थितीत गटारी अस्थाव्यास्थ अवस्थेत झालेल्या असताना सुद्धा कोणत्याची प्रकारची डागडुजी करण्याचे प्रयत्न होत नाहीत. त्याच प्रमाणे मागील २०१६-२०२१ कार्यकाल मध्ये विविध प्रकारचा भ्रष्टचार संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसत आहे. त्याच्यावर कार्यवाही करून निलंबित करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.