गुन्हेगारी
तलवारीने केक कापणे युवकाला पडले महागात; गुन्हा दाखल
रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अहीरवाडी येथील युवकाला आपल्या वाढदिवशी तलवारीने केक कापणे महागात पडले आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील अहीरवाडी येथील रहिवासी आकाश चौधरी (वय २९) याने आपल्या वाढदिवशी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण होतील असे कृत्य केल्याप्रकरणी पोकॉ चैतन्य पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबतची माहिती पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस नाईक नितिन डांबरे करीत आहेत.