शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावात दारु न पिता बेधुंद होऊन ढोल वाजवत होळी व भोंगऱ्या सण साजरा
व्यसनमुक्त अभियानाचे फलित एक नवा आदर्श - डाॅ.कृष्णा भावले
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील विरदेल गावापासून व्यसनमुक्त अभियानाची सुरवात झाली होती.त्याचे रुपांतर महाराष्ट्र सह गुजरात तसेच आदिवासी भागात मोठय़ा प्रमाणावर विस्तार वाढलेला आहे. या अभियानात आतापर्यंत एक लाखाच्या आसपास कुटुंब जुळली आहेत. मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन असलेल्या व्यक्तीमध्ये सुधारणा केली आहे. आणि कुटुंब संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती त्या बद्दल मला मनस्वी आनंद झाला आहे. असे सेवा व्यसनमुक्ती अभियान चे प्रमुख डाॅ.कृष्णा रामचंद्र भावले यांनी सांगितले.
त्याचाच भाग म्हणुन शिरपूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर आदिवासी भागात होळी व भोंगऱ्या सण दारुच्या नशेत बेधुंद होऊन साजरा केला जात होता.परंतु जेव्हा काही महिन्यांपासुन व्यसनमुक्ती अभियान आदिवासी गावात , पाडयात राबविण्यात सुरवात झाली.त्याचे उदाहरण म्हणजे रोहिणी गावातील आदिवासी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने होळी व भोंगऱ्या सण दारू न पिता ढोल वाजवत बेधुंद होऊन मोठय़ा उत्साहात साजरा केला. हा एक नवीन आदर्श घडविण्यास व्यसनमुक्ती अभियानाचे फलित आहे. असे डाॅ.कृष्णा रामचंद्र भावले यांनी सांगितले.डाॅ.भावले यांच्या अभियानातून आदिवासी कुटुंबातील सदस्य व्यसनापासुन दुर झाले.व संसार उद्ध्वस्त होण्यापासुन वाचविले त्याबद्दल आदिवासी बांधवांनी डाॅ.कृष्णा भावले अभिनंदन केले व आभार मानले.