वर्ष उलटूनही शेतकऱ्याच्या खात्यावर दुष्काळाचा अनुदान नाही
भडगाव (सतीश पाटील) गतवर्षी 23 मार्च रोजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी अनुदानचे पैसे मिळाले नाहीत. मार्च एन्ड चा कारभार असताना सर्व बँकांच्या वसुली या जोरात चालु असताना शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात पैशांची अडचण येत असून भडगाव तालुक्यात दुष्काळी निधी उपलब्ध असून देखील कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा मुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे अद्यापही पडलेले नाहीत.

दलवाडे शिवार वगळता गोंडगाव गावाचे अनेक शेतकऱ्यांची उन्हाळी व खरीप अतिवृष्टीच्या अनुदान मिळत नाही याबाबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. अखेर बळीराजाला न्याय मिळत नसल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. सत्ताधारी व विरोधकपक्ष एकमेकांच्या कुरबुरी करून राजकारण करीत आहे. मात्र शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.




