शिंदखेडा येथील एस.एस.व्ही.पी.एस.महाविदयालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्र व तहसील कार्यालय वतीने ग्राहक दिन साजरा
शिंदखेड़ा (यादवराव सावंत) संगणकीय व्यवहारात माहिती सुरक्षित, योग्य व्यवहार,शाश्वत ग्राहक हित अंतर्भूत करणे याला योग्य आर्थिक व्यवहार म्हणतात असे प्रतिपादन ग्राहक पंचायतचे नाशिक विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे यांनी केले. ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र व तहसिल कार्यालय शिंदखेड़ा यांच्या संयुक्त विद्यमानाने एसएसव्हीपीएस महाविद्यालय येथे आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेड़ा तहसीलदार सुनील सैंदाने होते.महाविद्यालयाचे स्थानिक कार्यकारिणी अध्यक्ष प्रफ्फुलकुमार सिसोदे, प्राचार्य डॉ.तुषार पाटील, उप प्राचार्य बी.ऐ.पाटील, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, अधीक्षक नरेंद्र भामरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांची प्रतिमा पूजन,रोप कुंडीला पाणी टाकून व ग्राहक गिताने झाली.
डॉ.अजय सोनवणे पुढे म्हणाले, स्वतंत्र उपभोक्ता मामले आहे.त्याच्या बँकिंग फायनान्स सर्विस व नॉन बँकिंग फायनान्स सर्विस यावर सद्सदविवेक बुद्धीने व्यवहार केले पाहिजे.अनुचित व्यवहारात डाटा हैकिंग,ओळख चोरी आदि होत असतात. कुणाला पीन शेयर करू नका, पासवर्ड स्ट्रांग ठेवा. बँक डिटेल्स कोणाला देऊ नका. वेबसाइट वर हिरवा ठिपका व यस असेल तरच ओपन करा, डिलीवरी बॉय समोरच पैकेट उघडा, त्याची रिकॉर्डिंग करा व नंतर पैसे दया. एकूण 47प्रकारचे फ्रॉड आहेत. त्यापासून सावध रहा, बँकिंग व्यवहार अधुन मधून तपासा, कंपनी मध्ये गुंतवणूक करतांना अभ्यास करुन करा तसेच ग्राहकाचे हक्क व कर्त्यवे विषयी माहिती दिली.