जुन्या रहिवाशी लक्ष्मीनगर भागात टाकीजवळील भुयारी गटार काम सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या ३५ वर्षांपासून रहिवाशी असलेल्या प्रभाग क्र ७ मधील गट नंबर १७५१ मधील लक्ष्मीनगर भागातील पाण्याच्या टाकीजवळील भागात भुयारी गटार काम सुरू झाले आहे. निवेदन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले होते.
याबाबत राजू फाफोरेकर यांच्या नेतृत्वाखाली अनिल ठाकूर, एस बी पाटील, भालचंद्र बाविस्कर, रवींद्र मुसळे,केवलसिंग राजपूत, संदीप मोरे, तुषार मोरे, विजय राणे, रवींद्र मुसळे, रतनलाल बिचवे संजय वानखेडे, दीपक बोरसे, प्रल्हाद बोरसे रवींद्र वानखेडे, सुनील सोनवणे,रामदास पवार, अरुणाबाई पाटील, मनीषा पाटील, उज्वला मोरे, सुनंदा शिरसाठ, गुलाब शिंदे, कविता वानखेडे, रवींद्र वानखेडे, वनिता सिसोदे, सखाराम पाटील, हिंमत चौधरी आदींनी समस्यांचे निवेदन दिले होते. याची दखल घेत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी काम सुरू केले. त्याबद्दल लक्ष्मीनगर वासीयांनी त्याचे कौतुक केले व आभार व्यक्त केल्याचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.