सोयगाव तालुका पेन्शनर्स डे उत्साहात साजरा
सोयगाव (विवेक महाजन) महामुनी अगस्ती वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सोयगांव तालुका पेन्शनर्स या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर (आबा) दयालराव काळे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र पेन्शनर्स उपाध्यक्ष असलेले विद्यमान वसंतराव सबनीस हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर काळे बबलू शेठ दिलीप मचे, कार्याध्यक्ष विलास जाधव, उपाध्यक्ष रखमाजी जाधव, सचिव नामदेव घुगे, घाटी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज पाटील, फुलंब्री तालुका अध्यक्ष के एस पद्मे, ह भ प भागवत महाराज गाडेकर, डॉ कसबे वैद्यकिय अधिक्षक ग्रामिण रूग्णालय सोयगाव, आशा तडवी नगराध्यक्षा, सोयगाव अक्षय काळे गटनेता, राजू दुतोंडे नगरसेवक, संतोष बोडके नगरसेवक, इत्यादी उपस्थित होते. सर्वप्रथम डीएस नाकारा आणि हरिचंद्र जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन वर्षात ज्ञात आणि अज्ञात जे पेन्शनर मयत झालेत, उच्चपदस्थ व्यक्ती मयत झाले आहेत अशा भारतातील सर्व व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
तालुकाध्यक्ष आबासाहेब बाविस्कर यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. मनोगत व्यक्त करताना डीएस नाकारा या नावाची भारतीय सैन्य दलातील उच्च पदस्थ अधिकारी यांनी भारतातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सर्वोच्च न्यायालयातून निवृत्ती वेतन मिळवून दिला. प्रत्येक सेवानिवृत्त धारकाने वर्तमानात जगायला शिका. भूतकाळात एक अधिकारी एक कर्मचारी जरी राहिले असाल, परंतु समाजात राहुन आपण एक समाजाचे अविभाज्य घटक आहोत याची धारणा मनातू रूजवली पाहिजे. आपण समाजाची देणे लागतो तो समाजाशी निगड़ीत सकारात्मक क्रिया, सकारात्मक कार्य प्रत्येक पेंशनर ने भाग घेऊन केले पाहिजे. तसेच ज्या पेन्शनर यांनी महाराष्ट्र शासनाच्या आवाहनानुसार आणि औरंगाबाद जिल्हा पेंशन संघटनेच्या हाकेला उत्तर देत 2020 मध्ये कोरोना मदत निधी शासनाला त्वरित जमा करून दिला. अशा सेवानिवृत्त सदस्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच या तालुक्याच्या विकासासाठी जे उच्च पदस्थ अधिकारी उत्कृष्टपणे कार्य करीत आहेत. अशा अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळावी तालुक्याचा विकास अधिकाधिक करावा म्हणून सर्व वयोवृद्ध सदस्यांना मिळून या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट प्रशासक म्हणून गौरवण्यात आले यात तहसीलदार गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तालुका भूमी निरीक्षक आदींना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, त्यांनी देखील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जसे येण्याचे आश्वासन देऊन देखील अनुपस्थिती दाखवून सर्व ज्येष्ठ वयोवृध्द सेवानिवृत्तांना नाराज केलेले आहे. राजा नाही तर अधिकारी नाही. मंत्री महोदयाप्रमाणेच अनुपस्थिती दाखवून ज्येष्ठ वयोवृद्ध सेवानिवृत्तांची उपेक्षा केलेली आहे. मोठी माणसे ,मोठे मंत्री, मोठे अधिकारी हे कार्यक्रमाला यावेत हे वयोवृध्द वयस्कर,अशक्त, दीन दुबळे लाचार अशा व्यक्तींनी का? मोठ्यांची सहकार्य सदभावनेची अपेक्षा करावी. परंतु सोयगाव तालुका पेन्शनर्स असोशिएशन आभारी आहे. प्रभाकर (आबा )काळे आणि हाजी शेख बबलू यांनी थोडा वेळ काढला आणि आमची राखली गेली.
या कार्यक्रमाला १५ ज्येष्ठ वयोवृद्ध ज्यांची वय ८०वर्षाचेवर आहेत. जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणारे सेवानिवृत्तांचा सत्कार, उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी, वेैशिष्ट्य पुर्ण व्यक्तीमत्व, समाज भूषण, समाज प्रबोधनकार, अशा तालुक्यातील विविध व्यक्तिंना देखील गौरवण्यात आले. यावेळी धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज पाटील, नामदेव घुगे, विलासराव जाधव, अध्यक्षीय भाषण वसंतराव सबनीस यांचे झाले
घुगे यांनी संघटनेच्या कार्यपध्दतीची माहिती दिली विलास जाधव साहेबांनी संघटनेच्या विविध मागण्या,लढा आणि नवीन जी.आर.बाबत माहिती दिली. तर सबनीस यांनी जिल्ह्याचे काही अधिकारी सेवानिवृतांच्या समस्यांचे निराकारण न करता वेठीस धरतात आपली संघटना कशी खंबीरपणे लढते. आपले सर्व तालुकाध्यक्ष यांची देखील तेवढीच ताकदीची असून पुर्णपणे जिल्हा संघटने च्या सोबत आहेत. कार्यक्रमाचे पुर्ण सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष आबासाहेब बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष चुन्निलाल कोटिये यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.