छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
सिल्लोड (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन करीत जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच शास्त्री कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, शिवसेना मतदारसंघ संघटक सुदर्शन अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, शहरप्रमुख मेघा शाह, माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका शंकूतलाबाई बन्सोड, कमलबाई जैस्वाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सत्तार हुसेन, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, संजय मुरकुटे, दीपक अग्रवाल, युवासेना उपजिल्हाप्रमुख अक्षय मगर, शहरप्रमुख शिवा टोम्पे, शिवसेना उप शहरप्रमुख संतोष धाडगे, रवी गायकवाड, फहिम पठाण, आशिष कटारिया, स्वप्नील शेळके, सचिन साळवे, आनंद सिरसाट, शिवाजी गायकवाड आदींची उपस्थिती होती.