यावल तालुका प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि समिती यांची ईश्वर चिठ्ठी पोल-खोल योजना
रावेर (अल्लाउद्दीन तडवी) यावल तालुक्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालय येथे जानेवारी 2022 मध्ये 85 टक्के अनुदान न्यूक्लियर बजेट योजनेअंतर्गत लघु उद्योगा करिता अर्ज मागविण्यात आले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात राबविला गेलेल्या लघु उद्योग का करिता 85 टक्के अनुदान ही न्यूक्लिअर बजेट योजनेअंतर्गत योजना राबवली गेली. त्याकरिता 2500 पेक्षा जास्त स्वरूपात अर्ज प्राप्त झाले होते आणि लाभार्थी लक्षांक संख्या कमी होती. त्याकरिता लाभार्थी निवड प्रक्रिया राबविणे गरजेचे होते परंतु संबंधित प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, कर्मचारी आणि समिती यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हास्य उडवत खेळखंडोबा करत प्रकल्प अधिकारी यांच्या दालनात ईश्वर चिठ्ठी स्वरूपात लाभार्थी निवडले परंतु त्या ठिकाणी समिती आणि कर्मचारी यांनीच लाभार्थी ठरविले कोणत्याही लाभार्थ्याने त्या ठिकाणी चिठी स्वतः काढले नाही आणि लाभार्थी यादी निवडली गेली. ज्यामुळे गरजू-गरीब लाभार्थी डावलले गेले आणि समिती मधील सदस्य अध्यक्ष हे उपस्थित होते. त्यांनीही त्यांचे मनमानी कारभार केले आणि योजनेच्या नावाप्रमाणे सुशिक्षित बेरोजगारांना न्याय न मिळता चांगल्या प्रकारे सुशिक्षित विद्यार्थ्यांना डावलून टाकले आहे.
होतकरू गरजू गरीब विद्यार्थ्यांमध्ये नाराजगी चे वातावरण निर्माण झाले आहे समितीच्या चुकीच्या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला आहे की त्यांनी न्याय तरी कोठे मागावे जर अधिकारी कर्मचारी आणि समिती त्यांच्या मनमानी कारभार करून लाभार्थींनी निवडत असेल तर गरिबांना न्याय तरी मिळेल कसा असा प्रश्न लोकांकडून होत आहे.