शिवजयंती निमित्त धारणीमध्ये मोटारसायकल रॅली
अमरावती (पंकज मालवीय) शिवसेना तालुकाध्यक्ष शैलेंद्र उर्फ राजू भाई मालवीय यांच्या नेतृत्वाखाली धारणी बसस्थानक ते दिया फाटे अशी भव्य रॅली काढण्यात आली. 100 हून अधिक मोटारसायकली काढण्यात आल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅली काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा घोषणा देण्यात आल्या. परिषद पंचायत समिती नगर पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे करणार असून 5 जिल्हा परिषद 10 पंचायत समित्यांमध्ये उमेदवार उभे करणार आहेत. आज शिवजयंतीनिमित्त धारणीचे तालुकाध्यक्ष राजूभाई मालवीय यांनी आज हजारोंच्या संख्येने शिवसेनेने आपली ताकद दाखवली आहे. शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. धारणी शहरात प्रथमच एवढी मोठी रॅली काढण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अनिल मालवीय राम मालवीय नगर पंचायत के उपाध्यक्ष सुनील चौथमल, शहर अध्यक्ष दिनेश धनेवार, राजू राठौड़, जयशंकर गुप्ता, विजय राऊत, आकाश राठौड़ आदी उपस्थित होते.