महाराष्ट्र
शिंदखेडा येथील नगरपंचायतच्या वतीने पत्रकार यांचा गौरव
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील नगरपंचायतचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहरातील प्रमुख पत्रकार यांचा शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अनिल वानखेडे यांनी अर्पण करून अभिवादन केले .त्यानंतर प्रा. दिपक माळी , प्रदीप दिक्षित, जी.पी.शास्री, सी.डी.डागा, अजय बोरदे, सतिष पाटील, भिका पाटील, विजयसिंह गिरासे, यादवराव सावंत, अशोक गिरणार, महेंद्र मराठे, संजय महाजन, परेश शहा, मनोज गुरव आदींचा गौरव करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश देसले, गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील ,भाजपचे शहराध्यक्ष प्रविण माळी , अॅड.विनोद पाटील सह बिजासनी प्रेटोल पंपचे कर्मचारी उपस्थित होते.



