नंदुरबार : येथील “जेतवन महाबुध्द विहार” समोर उभारण्यात येणाऱ्या बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अप्रतिम व भव्यदिव्य पुर्णाकृती पुतळ्यासाठी तळोदा येथील रहिवाशी संतोष उज्जैन, केदार सर, हर्षदा संतोष केदार व संजय उज्जैन केदार यांनी सामाजिक कर्तव्य समजून त्यांचे बंधु स्मृतिशेष सुधिर उज्जैन केदार सर यांचा नावाने रोख 10,000/-(दहा हजार रु ) धम्मदान दिले आहे. त्या अनुषंगाने जेतवन महाबुध्द विहार ट्रस्ट नंदुरबार,तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने आयुष्यमान संतोष उज्जैन केदार सर व परिवाराचे शतशः आभार व्यक्त करण्यात येत आहे.
Speed News Maharashtra
ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159