साक्रीशहर नगरपंचायत निवडणूक ; सतरा प्रभागातील उमेदवार
- साक्री (सतीश पेंढारकर) येथील नगरपंचायत निवडणूकीच्या १३ जागांसाठी दि. २१ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. ओबीसी आरक्षण प्रश्नांमुळे उर्वरित चार प्रभागातील स्थगित करण्यात आले होते. मतदान प्रक्रिया येत्या १८ जानेवारीला पूर्ण होत असून दुसऱ्या दिवशी दि. १९ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सदर मतदान प्रक्रियेतील प्रभाग निहाय उमेदवार खालीलप्रमाणे आहेत.
प्रभाग क्रमांक एकमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून कल्पना राजेंद्र खैरनार तर राष्ट्रवादी पक्षातर्फे वर्षा विजय भामरे व भाजपाकडून एडवोकेट पुनम जगदीश शिंदे निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादीतर्फे स्वाती नितीन बेडसे व भाजपातर्फे संगीता बाबूलाल भावसार यांच्यात लढत आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपच्या उषाबाई अनिल पवार व शिवसेनेच्या उषा दिलीप बहिरम या उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक चार भाजपकडून प्रवीण राजेंद्र निकुंबे तर काँग्रेसकडून दशरथ रंगनाथ भवरे तर शिवसेनेकडून भूषण अतुल महाले हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपाच्या मनीषा राजेंद्र देसले, राष्ट्रवादीच्या पूजा जितेंद्र मराठे यांच्यात लढत आहे.
प्रभाग क्रमांक सहामध्ये अपक्ष उमेदवार निकिता भालचंद्र चव्हाण व शिवसेनेच्या चित्रा पंढरीनाथ ठाकरे, भाजपाकडून रेखा आबा सोनवणे व काँग्रेसकडून मनीषा दिनेश नेरकर अशी चौरंगी लढत आहे. प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपच्या संगीता सुहास चाळसे, शिवसेनेच्या सोनल सुमित नागरे, काँग्रेसकडून जोशीला अमर पगारिया पक्ष कोमल हिम्मत सोनवणे अशी लढत आहे. प्रभाग क्रमांक आठमध्ये जयश्री हिम्मत पवार काँग्रेसच्या गुंताबाई दामू बागुल व शिवसेनेच्या उषा सुभाष सोनवणे या लढत आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये काँग्रेसच्या मनीषा दिनेश नेरकर, शिवसेनेकडून सुमित ज्ञानेश्वर नागरे व भाजपा कडून पंकज गिरधार हिरे उमेदवार आहेत.
वार्ड क्रमांक दहामध्ये शिवसेनेकडून शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पंकज पंढरीनाथ अहिरराव तर भाजपाकडून पंकज रामसिंग राठोड उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादीकडून ताराबाई राजेंद्र जगताप भाजपकडून उज्वला विजय भोसले तर काँग्रेस करून कल्पना जयवंत शिंदे. वार्ड क्रमांक १२ मध्ये काँग्रेसच्या माधुरी संदीप खैरनार, भाजपाच्या जयश्री विनोद पगारिया, शिवसेनेच्या मंगल रामभाऊ भिल उमेदवार आहेत. वार्ड क्रमांक १३ मध्ये भाजपचे शैलेंद्र भगवान आजगे तर शिवसेनेचे राहुल अरविंद भोसले यांच्यात सरळ लढत आहे. वार्ड क्रमांक १४ मध्ये भाजपचे एडवोकेट गजेंद्र भोसले, शिवसेनेचे प्रमोद भटू येवले व काँग्रेसच्या अनिता राजेंद्र रामोळे उमेदवार आहेत. वार्ड क्रमांक १५ मध्ये काँग्रेसकडून कमलाकर मोहिते, शिवसेनेकडून सतीश भीमराव मोहिते, भाजपाकडून दीपक दिलीप वाघ हे उमेदवार आहेत. वार्ड क्रमांक १६ मध्ये भाजपाकडून भाग्यश्री योगेश चौधरी, काँग्रेसकडून नर्गिस बी याकूब पठाण, शिवसेनेकडून हूरबानो नासिर शेख व अपक्ष म्हणून मुमताज पठाण उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपाकडून बापूसाहेब पुंडलिक गीते, काँग्रेसकडून नदीम खान याकुब पठाण, शिवसेनेकडून भटू दिलावर पिंजारी अपक्ष उमेदवार म्हणून प्रकाश बंडू रामोळे निवडणूक लढवीत आहेत.
साखरी शहरात गेल्या तीस वर्षापासून एक हाती सत्ता राखणारे नानासाहेब नागरे व अरविंद भोसले हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह यापूर्वीच शिवसेनेत सक्रिय झाले आहेत तर भारतीय जनता पक्षाने आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे सरळ सरळ या दोन्ही पक्षातच ही खरी लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील सत्ता गणितानुसार शिवसेनेबरोबर आहे तर काँग्रेस पक्षानेही काही उमेदवार दिले आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाची दखल घेणे योग्य ताकद शहरात राहिलेली नाही. त्यामुळे त्यांची नावालाच उमेदवारी आहे. सत्तेची सगळी सूत्रे बदलल्यामुळे व भारतीय जनता पार्टी कडून मोठ्या प्रमाणावर निवडणुकीचे नियोजन केले असल्यामुळे येत्या १९ तारखेला नेमक्या कुणाच्या पारड्यात किती जागा पडतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. पण, तरीही गेल्या काही वर्षापासून एक हाती सत्ता राखणाऱ्या गटनेत्यांच्या किल्ल्यात भाजपच्या माध्यमातून काही लोक निश्चितच प्रवेश करतील हेही निश्चित आहे.