वैजापूर तहसिल कार्यालयासमोर चालू असलेल्या आंदोलकांनी शहीद जवानांना केले अभिवादन
वैजापूर (प्रतिनिधी) वैजापूरमध्ये शहीद दिनानिमित्त आज तहसील प्रांगणात शहीद भगतसिंग, शहीद शिवराम राजगुरू,शहीद सुखदेव थापर यांना शहरातील सर्व जातिधर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन अभिवादन केले. प्रथम उपजिल्हाधिकारी माणिक आहेर नायब तहसीलदार कुलकर्णी, वैजापूरचे कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी पुष्प फुले वाहून शहीद जवानांना अभिवादन केले.
त्यावेळेस राजू पठाण व समाज कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, नगरसेवक उल्हास ठोंबरे, दीपक सिंह राजपूत यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर अक्रम-खान, मोजमखान, शकील शेख, अवधुतानंद महाराज, दिगंबर गायकवाड, वैजीनाथ मिटकरी, अशोक धसे, सी,एम,चन्नेपाटील, निवृत्ती सोमासे, कांशीराम राजपूत, याशिवाय इतर सर्व नागरिकांनी शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन केले. कोविड लस घेण्याचे आवाहन राजपूत यांनी केले. माणिक आहेर यांच्या हस्ते उपस्थितना मास्क वाटप करण्यात आले. राजेंद्रसिंह राजपूत, रियाजखान राजू पठाण व शेख, अवधुतानंद महाराज, दिगंबर गायकवाड, वैजीनाथ मिटकरी, अशोक धसे,सी,एम, चन्नेपाटील, निवृत्ती सोमासे, कांशीराम राजपूत याशिवाय इतर सर्व नागरिकांनी शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन केले.



