भाजपा प्रणित उत्तर भारतीय मोर्चा यवतमाळ जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा व चमुचा सन्मान हा जिल्ह्याच्या भाजपाचा सन्मान
अमरावती (महेंद्रसिंग पवार) नुकत्याच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यात पुन्हा एकदा भाजपा ला नेत्रदीपक यश प्राप्त झाले.उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या संदर्भात पिलीभीत जिल्ह्यातील बरखेडा, बिसलपुर व पुरनपुर या विधानसभा क्षेत्रातील प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी राकेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून सतीश त्रिवेदी, संजय पांडे पुसद व अनिल तिवारी या चमूने सतत 40 दिवस अहोरात्र, पूर्णवेळ प्रचारमोहिम यशस्वीपणे राबविली.प्रतिकूल परिस्थितीत नैसर्गिक आपत्तींचा धैर्याने मुकाबला करत,स्थानिक नेतृत्वासोबत समन्वयातून निवडणूक प्रचार कार्याचे नियोजन केले. परिणामतः पिलीभीत जिल्ह्यातील चार ही मतदार संघात बीजेपी उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.
यवतमाळ जिल्हा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष राकेश मिश्रा व त्यांच्या चमूच्या या कार्याची दखल घेऊन लखनौ उत्तर प्रदेश येथील मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना दिनांक 25 मार्च रोजी होणार्या शपथग्रहण समारोहा साठी आवर्जून सादर निमंत्रित करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदरणीय आमदार मदन येरावार, आ.प्राचार्य डॉ. अशोक उईक, आ.डाॅ संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर,(चंद्रपुर), आ.मुनगंटीवार (चंद्रपुर), नितीन भुतडा यवतमाळ जिल्हाध्यक्ष भाजपा यांचे कडून वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा प्राप्त केल्याने तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश अध्यक्ष संजय पांडे, प्रदेश महामंत्री प्रद्युन्म शुक्ला यांचे नेतृत्वात हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकले याचा राकेश मिश्रा यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
मुख्यमंत्री कार्यालय लखनौ येथून योगीजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांच्या व मंत्रीमंडळाच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी दिलेले निमंत्रण म्हणजे संपूर्ण यवतमाळ जिल्हा भाजपचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया राके राकेश मिश्रा यांनी या प्रसंगी दिली.