श्री संताजी जगनाळे महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
चोपडा (विश्वास वाडे) गेल्या २ वर्षाच्या कालखंडानंतर यंदा श्री संताजी नवयुवक मंडळ चोपडा व समस्त तेली समाज बांधवाच्या उपस्थीतीत संपन्न झाला. सर्वप्रथम चोपड्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषाताई चौधरी, गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक किशोर भैय्या चौधरी, नगरसेविका दिपाली चौधरी, संताजी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष गोरख चौधरी व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे हस्ते पालखी पुजन करून पालखीचे पांचपावली करून समाप्ती करण्यात आली.
काल्याचे किर्तन हभप संतोषभाऊ चौधरी, पांडुरंग चौधरी, संजय चौधरी, नंदू चौधरी, किरण चौधरी, सुभाष चौधरी यांनी व समस्त वारकरी भक्तांनी करून सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी समाजातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ मंडळी तसेच माता भगिणी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. अर्जुन चौधरी यांच्या कडून उत्कृष्ठ रांगोळी काढणाऱ्या महिलांना स्मृतीचिन्हाचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच गेल्या महिण्यापासून कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या सर्व संताजी नवयुवक मंडळाच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आदरणीय जविनभाऊ यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, श्री संताचा हा उत्सव एकमेकांना जवळ आणणारा उत्सव असून सर्वांनी समाजात एकी ठेवावी व सर्व मिळून हा उत्सव साजरा करावा त्यांनी संताजी नवयुवक मंडळाचे विषेश कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष गोरख चौधरी, उपाध्यक्ष अनंत चौधरी, दिपक चौधरी, विलास चौधरी, भूषन अशोक चौधरी, कार्याध्यक्ष अर्जुन चौधरी, खजिनदार भरत चौधरी, शरद चौधरी, सुनील चौधरी, निलेश चौधरी, किरण रघुनाथ चौधरी, गोवर्धन चौधरी, सुरेश चौधरी, दिलीप चौधरी, किशोर लक्ष्मन चौधरी, विकी चौधरी, कपील चौधरी, रामकृष्ण चौधरी, रितेष चौधरी, राजेंद्र चौधरी तसेच के डी चौधरी, टी एम चौधरी, पितांबर अप्पा आणि मधुदादा मंडळाचे मार्गदर्शक प्रकाशदादा चौधरी, फुलचंद अण्णा विनोद चौधरी, भुपेन्द्र चौधरी, संजय चौधरी इ उपस्थीत होते. शेवटी सर्व उपस्थीत समाज बांधवाचे प्रकाशदादा यांनी आभार मानले.