राणा दाम्पत्यांनी ज्योतीरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन केली बेलोरा विमानतळ विकासासाठी 50 करोड रुपयांची मागणी
केंद्रीय मंत्र्यानी तात्काळ निधी केला मंजूर
नवी दिल्ली (महेंद्रसिंग पवार) जिल्ह्याच्या तडफदार खासदार नवनीत रवी राणा व बडनेरा चे कर्तव्यदक्ष आमदार रवी राणा हे “जिल्ह्याचा विकास व्हावा-सुरू व्हावी विमानसेवा”या ध्येयाने बेलोरा विमानतळाचा विकास व्हावा व येथून विमान उड्डाण सुरू होऊन अमरावती जिल्हा देशाच्या हवाई नकाशावर यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आज खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन बेलोरा विमानतळाच्या उर्वरित अत्यावश्यक विकासकामाची पूर्तता करण्यासाठी 50 कोटी रुपयांची मागणी केली.
अमरावती हे 5 जिल्ह्याचे मुख्यालय असून,महानगरपालिका आहे,अमरावती हे विदर्भाचे शैक्षणिक व सांस्कृतिक माहेरघर समजल्या जाते,या जिल्ह्यात आई अंबा एकविरा देवीचे मंदिर,हिल स्टेशन चिखलदरा,मेळघाट टायगर प्रोजेक्ट, महानुभाव पंथीयांची काशी असणारे रिद्धपुर,जैन बांधवांचे तीर्थक्षेत्र मुक्तगिरी,तुकडोजी महाराजांची कर्मभूमी मोझरी, गाडगेमहाराजांची जन्मभूमी व निर्वाणभूमी,जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आदी सुप्रसिद्ध ठिकाणे असून, नांदगावपेठ येथे पंचतारांकित एमआयडीसी असून अमरावतीचा कपडा व्यापार हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. अशा या अमरावती जिल्ह्याला हवाई वाहतुकीची नितांत गरज असून या बेलोरा विमानतळाचा फायदा लगतच्या अकोला, यवतमाळ व वाशीम, बुलढाणा जिल्ह्याला सुद्धा होऊ शकतो हे खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या लक्षात आणून दिले व बेलोरा विमानतळ विकासासाठी 50 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दोघांचेही म्हणणे गांभीर्याने ऐकून घेऊन तात्काळ 50 कोटींच्या निधीला मंजुरात दिली. या निधीमुळे आता बेलोरा विमानतळाचा रखडलेला विकास मार्गी लागणार असून अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंग, उत्कृष्ट दर्जाची धावपट्टी, रात्रकालीन विमान वाहतुकीसाठी नाईट व्हिजन लँडिंग सिस्टम, पार्किंग सुविधा, कॅफेटोरिया आदी बाबी पूर्णत्वास जाणार असून बेलोरा विमानतळावरून सर्वप्रथम अमरावती-मुंबई,मुंबई-अमरावती अशी नियमित हवाई सेवा सुरू होईल.
व्यापारी,उद्योजक, शेतकरी,पर्यटक,आदींना आता अवागमन करणे सोपे होईल. ज्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक-व्यापारी-शैक्षणिक-, कृषी, पर्यटन विकासाला गती मिळेल व जिल्ह्यात रोजगार निर्मिती वाढून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल,आणि आपला अमरावती जिल्हा हा देशाच्या हवाई नकाशावर येईल असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला व केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 50 कोटी चा निधी मंजूर केल्याबद्दल अमरावती जिल्ह्यावासीयांच्या वतीने खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी त्यांचे आभार मानले आहे.



