शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंह चौक देगलुर येथे क्रांतिवीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
देगलूर (प्रतिनिधी) वीर सैनिक ग्रुप देगलुरच्या वतीने शहीद दिनानिमित्त देगलुरच्या शहीद भगतसिंग चौक येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर शहीद भगतसिंग, शहीद शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवंदन करण्यात आले.
दिनांक 23 मार्च ला स्वातंत्र्यवीर भगतसिंह, राजगुरू, आणि सुखदेव यांना लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली होती, त्यांच्या बलिदानासाठी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो! भारत मातेचे इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावे यासाठी स्वातंत्र्यवीर शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले म्हणुन देशाच्या प्रत्येक नागरिकांचे ते प्रेरणा स्थान तर आहेतच त्याच बरोबर त्यांचे विचार आजच्या नवतरुण युवकाने त्यांचे आदर्श घ्यावा.
अशा या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना वीर सैनिक ग्रुप देगलुर व भारतीय माझी सैनिक संघटना च्या वतीने स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्यात आले. त्यावेळी भारतीय माझी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष सूबेदार मेजर इंगोले (सेवानिवृत्त) आणि वीर सैनिक ग्रुप चे वीर सैनिक दत्ता मैलगीरे, बरसमवार श्रीकांत, बालाजी जाधव, आयनलवार श्याम, नूकूलवार नागनाथ, संतोष दंडेवार आणि देगलूर येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ तसेच अष्टपैलू सामाजिक व्यक्तित्व रवि काळे, संजय तोनसुरे, अतुल ठानेकर, प्रा.राहुल चाकूरकर, महात्मा ज्योतिबा फुले जिलास्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त, आदर्श शिक्षक व पत्रकार उमाकांत रघुनाथराव कोकने, प्रतिष्ठित राजकीय व सामाजिक कार्यकर्ते – शिवसेना उप शहर प्रमुख संजय जोशी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवा तालुका कार्य अध्यक्ष व पत्रकार शेख मोईन, लोकउर्जा चे संपादक व पत्रकार कपिल उल्लेवार, प्रेस संपादक व पत्रकार विशाल पवार, बालाजी कोरेवार, आदिनाथ आटपलवार, योगेश गलेगावे, राजू मेडपलवर, साई गदपवार, अरुण ऑऊलवार, गणेश दाडे, विट्ठल आयानलावर आणि देगलूर शहरातील असंख्य देशप्रेमी उपस्थित होते.