महाराष्ट्र
दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
अमरावती (महेंद्रसिंग पवार) स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सपंन्न झाले. या शिबिराला बौद्धिक सत्र विषय संवाद कौशल्य कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्राध्यापक मोरेश्वर इंगळे माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याचा आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा योग आला.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार मंगेश तायडे, प्रमुख पाहुणे म्हणून उमेश भाऊ शिरभाते, कार्यक्रम अधिकारीतिरमनावर, सर्व कार्यक्रम अधिकारी बाळापुरे, माजी विद्यार्थी अतुल इंगोले व्यासपीठावर उपस्थित होते. संवादकौशल्य हे आयुष्यात प्रेरणादायी असतात संवादातूनच व्यक्तीची ओळख निर्माण होते हे पटवून देण्याचा अल्पशा प्रयत्न केला. विद्यार्थी सुद्धा यात रममाण झाले.