जळगाव जिल्हा
अशोराज तायडे करणार लवकरच सामाजिक संघटनेची घोषणा

जळगाव (सतीश बावस्कर) विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी अशोराज तायडे यांनी लवकरच सामाजिक संघटना सुरू करीत असल्याची घोषणा केली. या संघटनेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित कष्टकरी शेतकरीसाठी ही संघटना काम करेल.
या संघटनेत जात-पात-धर्म या गोष्टीला कुठेच जागा नसेल फक्त माणूस म्हणून माणसासाठी ही संघटना काम करेल. मात्र, अजून संघटनेचे नाव व कार्यकारिणी गुलदस्त्यात असून लवकरच संघटनेचे नाव व कार्यकारणी जाहीर करु असे अशोराज तायडे यांनी यावेळी माध्यामाशी बोलताना सांगितले.