जळगाव जिल्हा
रेल्वेसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी DRM एस. एस. केडीया यांच्याशी केली चर्चा
मुक्ताईनगर (सचिन झनके) लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे रेल्वेचे भुसावळ विभागीय व्यवस्थापक DRM एस. एस. केडीया यांचेशी रेल्वेसंदर्भात चर्चा केली आहे.
मतदारसंघातील मुक्ताईनगर ते नाडगाव या बोदवड येथील रेल्वे गेट वारंवार, जास्त वेळेस बंद राहत असल्यामुळे वाहतुकीस खूप अडचणी निर्माण होतात. सर्व सामान्य जनतेला खूप त्रासाला समोर जावे लागते, जनतेची अति-तात्काळ सेवेतील रुग्ण-वाहिका बऱ्याच वेळेस अडचणीत येते, तसेच जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो, यातच रेल्वे ओव्हर ब्रिजचा मार्ग लवकरात लवकरात मार्गी लागल्यास वाहतुकीचा मार्ग सुखकर होईल, यासंदर्भात DRM एस. एस. केडीया यांचेशी चर्चा करतांना विभागाचे अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.