देगलूर महाविद्यालयाची स्नेहल कुलकर्णी लोकप्रशासन विषयात सेट ऊतीर्ण
देगलूर (प्रतिनिधी) अड्त व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविदयालयाच्या लोकप्रशासन विषयात पदव्यूतर शिक्षण पूर्ण केलेल्या व डॉ. बी. आर. कतुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवीसाठी संशोधन कार्य करित असलेली संशोधक विद्यार्थिनी कु. स्नेहल कुलकर्णी या विद्यार्थीनीने सेट परिक्षेत यश संपादन केले आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे आयोजित राज्यस्तरीय पाञता परीक्षा (सेट) दि.२६ सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आली होती. सदरील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून स्नेहल संतोष कुलकर्णी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार, देवेंन्द्र मोतेवार, गंगाधर जोशी, जनार्दन चिद्रावार, रवींद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, ऊपप्राचार्य निवृती गोविंदवार, पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांनी स्नेहल कुलकर्णी, लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्रप्रमुख डॉ बी. आर. कतुरवार, डॉ. एस.,एम. देबडे व प्रा. ज्ञानेश्वर कोकने यांचे आभिनंदन केले आहे.