महाराष्ट्र

३५ वर्षापासुनचा इतिहास कायम ठेवत धुळे जिल्ह्यातील वार सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध

धुळे (करण ठाकरे) धुळे तालुक्यातील वार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने निवडणूकितून सहकार क्षेत्रात सतत ३५ वर्षापासून संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूकिचा विक्रम प्रस्तापित केला आहे. दरम्यान नुकत्याच सुरु असलेली वार सोसायटी संचालक निवडणूकही बिनविरोध झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धुळे तालुक्यातील वार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली होती. धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे निवडणूक क्षेत्रात ३५ वर्षाचा बिनविरोध निवडणूकीचा इतिहास कायम ठेवत विक्रम प्रस्थापित के ला आहे. पंचवार्षिक निवडणूकीकरीता १३ जागांसाठी १३ जणांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यात संचालक म्हणून डॉ. दरबारसिंग गिरासे, दिलीप पाटील, युवराज मराठे, दिपक गिरासे, सुरेश ठाकरे, सरदारसिंग गिरासे, लताबाई जिरे, प्रमिलाबाई पाटील, यशवंत पाटील, आनंदा माळी, पितांबर माळी, गुलाबसिंग गिरासे, लताबाई भिल यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. सर्व बिनविरोध संचालकांचे महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी कौतुक केले आहे. निवडणूक बिनविरोध होणेकामी सर्व सभासद आणि निवडणूक निर्णय अधिकारी हितेंद्र देवरे, सचिव दिनेश भामरे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे