आंबापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना च्या हिवाळी श्रामसंस्कार शिबिराचे समारोप
शहादा (प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील म्हसावद येथील श्रीसाईबाबा कला वरिष्ठ महाविद्यालयाचा रा.से.यो. विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचा समारोप झाला
म्हसावद येथील क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव आणि श्रीसाईबाबा भक्त मंडळ संचलित, कला वरिष्ठ महाविद्यालय म्हसावद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचाचे आयोजन करण्यात आले होते. त्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचा समारोप करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबापूर गावाचे सरपंच बायसीबाई अजित पवार,उपसरपंच दिलीप नारसिंग पवार, पोलीसपाटील सुरेश गुलाबसिंग आहेर, ग्रामसेवक रवी रावनकर तसेच अंबापूरचे जेष्ठ नागरिक उपस्थित होते. आज विद्यार्थ्यांनी सात दिवसात आलेले अनुभव व शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांना गहिवरून आले. विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. श्रीराम बनसोडे कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक गिरासे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. संगिता पटेल मानव अधिकार परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर गवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य. एम. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त बाबत मार्गदर्शन शिबिराला बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विभाग विकास विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग डॉ विजय पाटील -जिल्हा समन्वयक अक्कलकुवा कॉलेज यांनी कमिटीची भेट दिली होती.
या शिबीरात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. ज्यामध्ये सार्वजनिक स्वच्छता, वृक्ष लागवड, बेटी बचाओ, बेटी पढाओ, ग्राम विकास, कोरोना मुक्त गांव, साक्षरता रॅली, लसीकरणाचे सर्वेक्षण आणि जनजागृती इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच बौद्धिक प्रबोधन व चर्चा सत्रात विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करुन तज्ञ व्याख्यातांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.ज्यामध्ये स्पर्धा परीक्षा व करीअर संधी, ग्रामीण विकास व विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना – एक राष्ट्रशक्ती, नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षणाचे भारतीयकरण, जैव विविधता व पर्यावरण, माझे गांव कोरोना मुक्त गांव, इत्यादी विषयांवर तज्ञ प्राध्यापकांचे व व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. व आज दि.28/03/2022 सोमवार रोजी साक्षरता रॅली काढून पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचे आवश्यकता व महत्व पटवून देत लसीकरण विषयक जनजागृती करण्यात आली.
शिबिराचे व्यवस्थापन प्राचार्य मनोज पाटील, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक गिरासे, प्रा सहा.कार्यक्रम अधिकारी संगीता पटेल अर्थशास्त्र विभागाचे प्रा.श्रीराम बनसोडे, सहा.प्रा. ज्ञानेश्वर गवळे, शिक्षकेतर कर्मचारी हेमराज पाटील, अविनाश चौधरी, जितेंद्र पाडवी, निवासी शिबिर यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले. श्रम संस्कार शिबिराच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे चेअरमन विठ्ठल हिरजी चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष धारुभाई सदाशिव पाटील, सचिव गणेश नरोत्तम पाटील, अंबापूर गावाचे सरपंच बायसीबाई अजित पवार, उपसरपंच दिलीप नारसिंग पवार, पोलीस पाटील सुरेश गुलाबसिंग आहेर, ग्रामसेवक रवी रायनकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.