सोयगांव येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी
सोयगांव : येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीराम मंदिर येथे अखंड हरीनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव आयोजन करण्यात आला होता. ह. भ. प. रवींद्र महाराज परेराव यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन झाले. संध्याकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. महामुनी अगस्ती महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, टाळकरी, कीर्तनकार, भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाले होते.
मंदिर पुजारी शांतराम जोशी, ह भ प रवींद्र महाराज, जितेंद्र पंडित महाराज, शरद महाराज, निवृत्ती मोहने, रामभाऊ सोहनी, संतोष सोहनी, सुधनवा केणेकर, ज्ञानेश्वर सोहनी, शिवलिंग अप्पा, शिवाजी चौधरी, प्रल्हाद चौधरी,जगन्नाथ दुतोंडे, कमलाकर पिंगाळकर, तान्हाजी गायकवाड, दामधर महाराज, ज्ञानेश्वर सोहनी,दुर्गादास केणेकर, गजानन जोशी, अशोक खेडेकर, संतोष भोई, राजू दुतोंडे, प्रसाद पठाडे, महेश मानकर, विकास रोकडे, अजय पाटील, निखिल पाटील, सचिन सोहनी, कैलास पिंगाळकर, विलास बोरडे, विजय पाटील, हर्षल विसपुते, विवेक जोशी, सुधाकर सोहनी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.