शेत-शिवार
शिरपूर तालुक्यातील व वरूळ गावाचे प्रसिद्ध टेक्नॉलॉजी पध्दतीने केळी उत्पादक शेतकरी
शिरपूर (गोपाल कोळी) तालुक्यातील व वरुळ गावाचे प्रसिद्ध व टेक्नॉलॉजी पद्धतीने व सेंद्रिय शेतीने भरघोस उत्पन्न घेणारा शेतकरी दामोदर सोमनाथ कोळी याच्या शेतात 50 kg पर्यंत एक झाडं केळीच आलेलं आहे. व ते टरबूज, डागर, पपई, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, गवार, मिर्ची व कांदा-लसुन, हरभरा, गहू, भुईमूग, व वेगवेगळे पीक लावत असतात व कमी जागेत जास्त उत्पादन घेत आहे.
दामोदर सोमनाथ कोळी स्वतः bsc कॅम्पुटर झाले असून त्यांनी नौकरी न करता शेती करावी, अशी इच्छा बाळगली. ते आता एका वर्षाला 15 ते 20 लाखांपर्यंत कमवत आहेत. नौकरी वाल्यांना सुद्धा आता शेती शिवाय पर्याय नाही. जर लोकांनी शेती करणं सोडलं तर लोक अन्न कसे खातील? म्हणूनच शेतकरी हा जगला पाहिजे.