नववर्षाच्या निमित्त सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांचा एक नवीन उपक्रम
जामनेर (ईश्वर चौधरी) शहरातील लोर्ड गणेशा शाळेत तसेच जामनेर तालुक्यातील पहूर येथील आर टी लेले महाविद्यालय तसेच केंद्र जिल्हा परिषद मुलांची शाळा व कन्या शाळा पहूर पेठ कसबे सर्व शाळांमध्ये जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य दूत प्रफुल रायचंद लोढा यांच्या सामाजिक बांधिलकीतून उपक्रम म्हणून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला रसायनविरहित एक किलो गुळाचे पॅकेट आज सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन वाटप करण्यात आले.
पहुर शहरातील आर टी लेले महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी येथील जीन प्रेसचे संचालक अरुण नाना घोलप हे होते. त्या प्रमुख अतिथी म्हणून ईश्वरबाबूजी पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव पाटील संस्थेचे संचालक एडवोकेट एस आर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, पत्रकार गणेश पांढरे, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन किरण खैरनार, माजी ग्रामपंचायत सदस्य विकास चौधरी, माजी सरपंच अशोक देशमुख, विनोद मेडिकलचे संचालक विनोद लोढा, रिखबचद शेठ लोढा यांच्या सह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या रसायन विरहित गुळाचे एक किलोचे पॅकेट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून अरुण घोलप यांनी सांगितले की स्वर्गीय रायचंद लोढा स्वर्गीय सुभागचंद लोढा यांच्या आशीर्वादाने प्रफुल लोढा यांनी संपूर्ण जामनेर तालुक्यात कोरोना कालखंडात जामनेर तालुक्यात गरजवंतांना किराणा सामानाचे वाटप करून दातृत्व दाखवून दिले त्याच पद्धतीने गोरगरिबांसाठी अहोरात्र दवाखान्याच्या कामासाठी वेळ आहेत. आज त्यांच्या या गुढीपाडव्याच्या नववर्षानिमित्त तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद महाविद्यालय शाळेत नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या गुळाचे वाटप सर्व विद्यार्थ्यांना करीत आहे. कार्यक्रमाबद्दल त्यांचे आभार मानतो असे वक्तव्य त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजय बोरसे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आर बी पाटील यांनी मानले. शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.