छपत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळयाचे बीडचे सोनेरी रंगाचे भाले चोरणाऱ्या चोरट्याला अटक !
धुळे (प्रतिनिधी) धुळे शहरातील चाळीसगाव श्रीराम पेट्रोल पंपा समोरील श्री छपत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळयाचे कठडयाचे संरक्षणकामी लावलेल्या लोखंडी कम्पाउंडवरील बीड धातुचे भाले हातोडयाचे सहाय्याने तोडुन चोरुन नेणाऱ्या चोरट्याला धुळे शहर पोलीस पोलिसांनी अटक केली आहे. नजीर अलम शम्मी मोहमंद शाह (वय २७ रा.८० फुटी रोड, भंगार बाजार, धुळे) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे की, धुळे शहरातील चाळीसगाव श्रीराम पेट्रोल पंपा समोरील श्री छपत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळयाचे कठडयाचे संरक्षणकामी लावलेल्या लोखंडी कम्पाउंडवरील बीड धातुचे भाले हातोडयाचे सहाय्याने तोडुन चोरुन नेले होते. त्याबाबत धुळे महानगर पालीकेच्यावतीने कनिष्ठ अभियंता हेमंत पिराजी पावटे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन ६४०००/- रुपये किंमतीचे १२८ बीडचे सोनेरी रंगाचे भाले चोरुन नेल्याबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात आरोपी नजीर अलम शम्मी मोहमंद शाह (वय २७ रा.८० फुटी रोड, भंगार बाजार, धुळे) याचा शोध घेवून त्याला अटक करुन त्याचेकंदील गुन्हयातील चोरीस गेलेले ६४०००/- रुपये किंमतीचे १२८ बीडचे सोनेरी रंगाचे भाले हा संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
उप वि.पो.अधि. दिनकर पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.निरी. नितीनन देशमुख, सपोनि/दादासाहेब पाटील, पोहेकॉ/विलास भामरे, पोहेकॉ/ मुक्तार मंन्सुरी, पोहेकॉ सतिष कोठावदे, पोना/कुंदन पटाईत, पोना/राहुल सोनवणे, पोकॉ/निलेश पोतदार, पोकॉ/शाकीर शेख, पोकॉ/अविनाश कराड, पोकॉ/तुषार मोरे यांनी कारवाई केली.