समाजात आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्रीयांना सन्मान : अनिता देशमुख
शहरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले दाम्पत्यांच्या स्मारक व्हावे - सर्व महिलांची मागणी
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे दिनांक ३ जानेवारी २०२२ सोमवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ वी जयंतीनिमित्त दादासाहेब रावल नगरपालीकेचे स्टेडियम हॉल येथे माळी समाज व महात्मा ज्योतीबा फुले युवा मंचच्यावतीने सावित्रीलेकी सन्मान सोहळा संपन्न झाला.
त्यात शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, पोलीस तसेच विविध क्षेत्रात कार्यरत एकूण पन्नास महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ताईसो अनिताताई रवींद्र देशमुख, विशेष अतिथी म्हणून ताईसो अंजनाताई ज्ञानेश्वर भामरे व ताईसो वैशालीताई प्रवीण महाजन होते. तसेच विविध समाजातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासन स्तरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
ताईसो अनिताताई देशमुख व ताईसो वैशालीताई महाजन यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल आपले विचार मांडलेत.तसेच सत्कारमुर्ती सौ. पुजा खडसे, अंशुल कपूर , वैशाली पवार, कल्पना माळी, चंद्रकला सिसोदिया यांनीही आपले अनुभव व विचार मांडलेत. या सर्व महिलांच्या भाषणात खासकरून एक मुद्दा म्हणजे, गावात-चौकाचौकात जसे इतर थोर-महात्मा-युग पुरूषांचे स्मारके आली.तसेच गावात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ह्या दाम्पत्यांचा स्मारक ही व्हायला पाहिजे, अशी एकेरी मागणी भाषणात दिसुन आली.यावेळी उपस्थितांनीही त्यांच्या या मागणीचे स्वागत करत, मागणी रास्त असल्याचे बोलून दाखवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जाधव, प्रास्थाविक – मनोज महाजन यांनी केले. समाजातील जेष्ठ मंडळींनीही योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक मनोज महाजन, रवींद्र महाजन, मयूर महाजन, अनिल जाधव, ईश्वर माळी, निंबा सोनवणे, भुषण महाजन, कैलास माळी, अनिल माळी, राजेश महाजन, नामदेव वाडिले, आर टी माळी, अनिल माळी, बापू सूर्यवंशी, रवींद्र माळी, निलेश जाधव, संतोष माळी, प्रमोद महाजन, आकाश महाजन, अमोल महाजन, निर्मल माळी, अशोक महाजन, हर्षल माळी, वंजी माळी, निखिल जाधव, योगेश देवरे, हिमांशू माळी, गोरख माळी, प्रमोद माळी, जयेश माळी, दीपेश माळी, किरण माळी, धनराज माळी, सागर माळी, मनोज माळी तसेच समस्त माळी समाज व महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच दोंडाईचा शहर यांनी परिश्रम घेतले.