शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे महात्मा फुले जयंती निमित्त अभिवादन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती निमित्ताने भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले समाजसुधारक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ असे बहुआयामी व्यक्ती होते. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर समर्थक होते.
विशेषतः स्त्री शिक्षणासाठी ते आग्रही होते. ते भारतीय समाजात प्रचलित जाती आधारित विभाजन आणि भेदभावाच्या विरोधात होते. महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व दीनदुबळ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची 195 वी जयंती निमित्त त्यांच्या विचारांना जनमानसात पोचविण्याची गरज आहे असे वक्तव्य मान्यवरांनी केले.
यावेळी भैया माळी, योगेश गिरासे, शुभम माळी, जगदीश माळी, राहुल पाटील, सनी पाटील, बारकू माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश माळी यांनी केले.