महाराष्ट्र
धारणी तहसीलमध्ये नांदुरी गावात रस्त्यावर कचरा ; ग्रामपंचायतचे कर्मचारी बेपर्वा
धारणी (इंद्रकुमार राजनकर) नांदुरी गावात गेल्या सहा किंवा आठ वर्ष झाले तरी कचरा उचलला नाही. ग्रामपंचायतच्या वॉल कंपाउंडला लागून हा कचरा फेकला जातो. आतापर्यंत ग्रामसेवक व सरपंच या लोकांची समितीला तो कचरा का दिसला नाही. या लोकांनी डोळे बंद करून ठेवले आहे का ? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो.
ग्रामपंचायतच्या आजू बाजूला स्वच्छता राहणार नाही. गावात का स्वच्छता राहणार असे गावाचे कित्येक जागा रस्त्याच्या बाजूला कचरा फेकला जातो. रस्त्याच्या बाजूला कचरा फेकला जातो. आणि तोच कचरा हळूहळू रस्त्याच्या वर येतो. याच कारणामुळे गावाचे लोक आजारी पडतात. उन्हाळ्यात व हिवाळ्यात गावाचे लोक सहन करून राहतात परंतु ही समस्या पावसाळ्यात सहन करणं शक्य होत नाही.