महाराष्ट्रराजकीय
मैत्री ग्रुप ऑफ कंपनीच्या गुंतवणूकदारांना नियमानुसार परतावा मिळवून देण्याबाबत बैठक संपन्न
नाशिक (प्रतिनिधी) आज सी पी ऑफिस नाशिक येथे मैत्रेय परतावेबाबत गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाने व आमदार अनिल अण्णासाहेब गोटे यांच्या आध्यक्ष्यतेखाली आणि मैत्री ग्रुप ऑफ कंपनीच्या गुंतवणूकदारांना योग्य त्या नियमानुसार परतावा मिळवून देण्याबाबत बैठक संपन्न झाली.
यावेळी बैठकीत पांडे पोलीस सी.पी.नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक तसेच मैत्रेय शिष्टमंडळा वतीने डॉ.जी.एन हरपनहळ्ळी, यसीन सय्यद, गंगाधर तोडकर, नानासाहेब पाटील, रामराव मोरे, विष्णुसंकपाळ, उषाताई पाटील, शिल्पा बिडकर, मानिकताई माळी, सिमा गुंड, रत्नमाला नाईक, रेहाना सय्यद, सुप्रीया तोडकर आदी उपस्थित होते. अशी माहिती उषाताई पाटील यांनी दिली व अविनाश राजाराम लोकरे प्रसिद्धीप्रमुख सोशल मीडिया प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी धुळे यांनी प्रसिद्धी केली.