नोटरी-सैनिक भरती विद्यार्थी लुटप्रकरणी फी – आकारणी फलक लावण्याची शिफारस
भडगाव : येथील नोटरी परवानाधारक अँड हेमंत कुलकर्णी.याने विद्यार्थी व नागरिकांची अनधिकृत फी घेऊन भरमसाठ प्रमाणात शासन नियमापेक्षा जादा रक्कम वसूल करून लूट केल्याच्या तक्रारी १५ विद्यार्थी नी दिल्या आहेत.
या संदर्भात भडगाव तालुक्यातील विद्यार्थीची व नागरिकांच्या होणाऱ्या लूटीला आळा घालण्यासाठी विजय पाटील (सामाजिक कार्यकर्त) यांनी तहसीलदार कार्यालय व मे.न्यायालय भडगाव याचेकडे “नोटरी फी आकारणी बाबत.” माहिती फलक प्रसिद्धी ला लावण्याची मागणी लेखी पत्र दाखल करून केली आहे. तशी माहिती नोटरी फी आकारणीबाबत फलक लावण्याची नि.तहसीलदार यांनी शिफारस केली आहे. तहसील कार्यालयात आवारात माहिती फलक लावले तर नोटरीची किती फी कागदपत्रे नोटरायझेशनची लागते. त्या संदर्भात जनजागृती होऊन विद्यार्थी व नागरीकाची अँड हेमंत कुलकर्णी कडुन अवैध रंक्कम लुटीला आळा घालण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. व किती विद्यार्थी, नागरिकांकडून जादा नोटरी फी आकारणी केली आहे. ती न्यायालयीन चौकशी करून सदर जादा रक्कम रू परत मिळण्यासाठी जिल्हा न्यायाधीश सो. ग्राहक मंच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येत आहे.