महाराष्ट्रराजकीय
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ; जय मल्हार सहकार पॅनलचा दणदणीत विजय
दौंड (गौरव दिवेकर) दौंड तालुक्यातील ‘बोरीभडक’ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय मल्हार सहकार पॅनलने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवून आपली सत्ता स्थापन केली.
विजयी झालेल्या सर्व संचालकांन भेट घेतली. या संस्थेच्या चेअरमन पदी आकाश संभाजी गव्हाणे तर व्हा. चेअरमन पदी अक्षय बाळासाहेब काळे या युवा सहकाऱ्यांची निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन आणि संचालकांचे अभिनंदन केले आणि त्यांना भावी वाटचालीस मन: पूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त, शेतकरी सभासद आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.