महाराष्ट्र
घरकुल योजनेतील अपात्र जमातींच्या मालपुर ग्रामपंचायतीवर धडक मोर्चाच्या तयारीत
मालपुर (गोपाल कोळी) ग्रामपंचायत मालपुर येथिल प्रधानमंत्री आवास योजना ड यादीतील चुकीच्या लाभार्थीची निवड करण्यात आली आहे. धनदांडग्यांना लाभ देण्यात आला आहे तरी गरजू व गरीब लाभार्थींना वगळुन अपात्र ठरविण्यात आले असुन ग्रामपंचायत कार्यालयात बसुन सर्वे करण्यात आला असून हेतु पुरस्कुत व सुड बुद्धीने काही पात्र लोकांना अपात्र ठरविण्यात आले असुन अपात्रे लाभार्थी ग्रामपंचायत कार्यालयात लवकर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. गोरख नान्हु ठाकरे, बापु वामन ठाकरे, धोंडु लांडगे, संजय पाटील, भास्कर तानका पगारे, सुभाष धनगर व अशी मागणी मालपुर ग्रामस्थांकडुन धडक मोर्चा काढला जाईल अशी ग्वाही देण्यातं आली.