शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील धनगर कुटुंबाकडे धाडसी चोरी
रोकड दागिन्यासह तीन लाखांचा ऐवज लंपास
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील सात किमी अंतरावर विरदेल येथील रहिवाशी पंडित आधार धनगर (वय ५२) हे अंगाची लाही लाही होणाऱ्या उन्हामुळे वाढलेला उकाडा पाहून आणि त्यातून सुटकारा मिळविण्यासाठी अख्खे कुटुंब घराला कुलूप लावून छतावर झोपायला गेले. ही नामी संधी साधून चोरटय़ांनी घरात प्रवेश करून दोन लाखांची रोकड सह एक लाखाची दागिने सह तीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पहाटे सुमारे साडेचार वाजता धाडसी चोरी झाली आहे.
यात पहाटे साडेचार वाजता जेव्हा हिराबाई धनगर (पत्नी) खाली उतरून जेंव्हा पहाते तेंव्हा घराचे कुलुप तोडलेले व दरवाजा उघडला असल्याचे दिसले त्यामुळे त्या घाबरल्या वर येऊन त्यांनी त्यांच्या यजमानास सर्व हकीकत सांगितली आणि दोन्ही जण खाली आले असता त्यांनी बघितले की घरातील सगळे सामान अज्ञात चोरट्यांनी अस्ताव्यस्त करून ठेवला व घरातील लोखंडी कपाट उघडे करून व त्यातील सामान कपडे साहित्य जमिनीवर पडले होते आणि घरातील किचन रूम मधून कडप्यावर असलेली लोखंडी पेटीचे कुलूप तोडून पेटीतील सामान चोरले असल्याचे त्यांना आढळले साधारणपणे दोन लाख रुपये रोख व पंधरा हजार रुपये किमतीचे ८ ग्रम वजनाचे सोन्याचे टोंगल, वीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रमची सोन्याची चेन, आणि पंधरा हजार रुपये किमतीचे एक किलो वजनाच्या चांदीचे पायातील कडे असे एकूण १ लाख रुपयांपर्यंतचे चोरण्यात यश लाभले. चांदीचे दागिने रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.शेती कराराने घेण्यासाठी दोन लाख रुपये घरात ठेवले होते. तसेच दादर विक्री केली त्यातून रोकड घरात होती. तरी दाम्पत्याने तसे शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या श्वानपथकाने विरदेल गावाबाहेर पर्यंत माग दाखवला परंतु चोरटे गाडीने पसार झाले असतील तेथे श्वान येऊन थांबले. फिंगर प्रिंट च्या टीमलाही ठसे मिळाले नाहीत कारण या दाम्पत्याने कपाटीस कुलूप लावलेले नव्हते. ते अगदी सहज उघडून चोरी करून पसार झाले.
पुढील तपास पी एस आय रवींद्र केदार, पोलीस निरीक्षक सुनील भाबड, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांना मदतनीस गोपाल माळी, व किरण बागुल यांची मदत लाभली. दरम्यान धनगर शेजारच्या घरात देखील चोरटय़ांनी धाडस केले होते मात्र तेथे काही हाती लागले नाही.म्हणुन आता चोरटय़ांनी ग्रामीण भागात देखील शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरी आपली स्वतची काळजी आपणच घ्यावी असा सुर रहिवासी नागरिकांमधुन निघत असताना ग्रामीण भागात पोलिसांनी रात्री च्या सुमारास गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडुन सहकार्य अपेक्षित असले तरी आपण ही खबरदारी घ्यावी घरातील किमती वस्तू जवळ बाळगणे आवश्यक आहे. बाहेरगावी जात असल्यास शेजारच्याना माहिती देणे गरजेचे आहे. असे शिंदखेडा पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी रहिवासी नागरिकांना आवाहन केले आहे.