राजकीय

नाशिक शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी स्वप्नील पाटील विजयी

नाशिक (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अंतर्गत झालेल्या निवडणुकीत नाशिक शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी स्वप्नील पाटील यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला आहे.

राहुल गांधींच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या युवक काँग्रेस निवडणुकीमध्ये अंत्यत चुरस निर्माण झाली होती तरी अनेक युवकांनी यामध्ये प्रामुख्याने सहभाग घेतला होता तरी या चुरशीच्या निवडणुकीत स्वप्नील पाटील यांची सलग चौथ्यांदा नाशिक शहर (जिल्हा) अध्यक्षपदी साडे आठ हजार मतांनी विजय मिळवला , प्रदेश युवक सरचिटणीस पदी गौरव पांनगव्हाणे यांची अठ्ठावीस हजार मतांनी निवड झाली.

तसेच मध्य-नाशिकच्या अध्यक्षपदी जयेश सोनवणे, पश्चिम नाशिकच्या अध्यक्षपदी देवेंद्र देशपांडे, पूर्व नाशिकच्या अध्यक्षपदी रोहन कातकडे, प्रदेश सचिवपदी आतिषा पैठणकर तसेच ग्रामीण युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मानस पगार यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यानिमित्ताने काँग्रेस भवन मध्ये त्याचे अभिनंदन नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर व गटनेते शाहू महाराज खैरे, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, नगरसेवक समीर कांबळे, नगरसेवक वत्सला काकू खैरे, नगरसेवक राहुल दिवे, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती-जमाती विभागाचे सरचिटणीस सुरेश मारू, उध्दव पवार, किरण जाधव, विक्रात वावरे, गौरव सोनार , प्रमोद धोंडगे, सुदेश(अण्णा) मोरे यांच्या बरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे