व्यसनमुक्ती जनजागृती काळाची गरज : राज मोहम्मद खान शिकलगर
चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आश्रम शाळा, सत्रासेन येथे व्यसनमुक्ती जनजागृती या विषयावर जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान ब्रॅण्ड एम्बेसेडर तथा जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण समनव्य समितीचे सदस्य मा. राज मोहम्मद खान शिकलगर यांनी मार्गदर्शन केले. तर अध्यक्ष म्हणून प्रा. ज्ञानेश्वर भादले हे लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करून झाली. प्रास्ताविक प्रा. दिलीप गिर्हे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून कार्यक्रमाची भूमिका सांगितली. राज मोहम्मद खान यांनी व्यसनमुक्ती जनजागृती या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.
व्यसनमुक्ती जनजागृती काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्यामागचे कारणे सांगताना. कामाचा ताण, निसर्गातील बदल यामुळे तरुण मंडळी तणावाखाली जीवन जगत आहे. या तणावातून मुक्तता मिळवण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेकडे वळताना दिसतो. भारताचा तरुण जर व्यसनाधीनतेच्या अहरी गेला तर तरुण पिढी पूर्णपणे पोखरून जाईल व देशाचे भवितव्य अंधारमय होऊ शकते. तसेच स्वतः चा परिवार व्यसनाधीनते पासून कसा दूर ठेवता येईल, स्वतःचे गाव, स्वतःचा तालुका, स्वतःचा जिल्हा व्यसनाधीनते पासून दूर ठेवण्यात तरुणांचे महत्त्वाचे योगदान असते. व्यसनाधीनतेच्या झळा व दुष्परिणाम त्यांनी स्वतः अनुभवल्या. या प्रसंगांमध्ये डॉ. सुरेश बोरोले अध्यक्ष, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था यांनी मला आजारपणात उपचारासाठी आर्थिक मदत केली त्यामुळे माझे प्राण वाचले. दादासाहेब यांनी केलेली मदत आयुष्यात कधीच विसरणार नाही, त्यांच्या त्या सहकार्यामुळे मी आज संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनाधीनता जनजागृती यावर कार्य करत आहे. आशा पध्दतीने दादासाहेब यांचे आभार मानले. राज मोहम्मद खान यांनी स्वतः वर ओढवलेल्या संकटाचे वर्णन करताचक्षणी एनएसएस स्वयंसेवक व उपस्थित मान्यवर गहिवरले होते. असं वास्तव चित्रण त्यांनी आपल्या वाणीतून व्यक्त केले. आपला परिवार व समाज व्यसनाधीनते पासून कशा पद्धतीने दूर राहील यासाठी आपण प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला व्यसनाधीनते पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील कमीत कमी पाच व्यक्तींना व्यसनाधीनते पासून दूर ठेवण्याचे राष्ट्रकार्य तुम्ही करावे असे आवाहन प्रा. ज्ञानेश्वर भादले यांनी केले.
प्रा. नरेंद्र देसले यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील व्यसनाधिनता, महिलांमधील वाढती व्यसनाधीनता व समस्या, मोबाईलचा अतिरिक्त वापर व त्याचे दुष्परिणाम स्पष्ट करून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदिनी वाघ तर आभार डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला शिबिरातील रासेयो स्वयंसेवक आश्रम शाळा सत्रासेन येथील विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.