जळगाव जिल्हा

खडसे महाविद्यालयाचे पुरुष व महिला दोन्ही संघ बाँलबँडमिंटन स्पर्धेत विजयी

मुक्ताईनगर (सचिन झनके) नुकत्याच गोदावरी आय .एम .आर. कॉलेज जळगाव येथे संपन्न झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म. विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत जी.जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगरचे दोन्ही म्हणजे पुरुष व महिला बॉल बॅडमिंटन संघ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजयी झाले. संघात पंकज खिरोडकर( कर्णधार), प्रबोध बोदडे, सिद्धांत बोदडे, राहुल बोदडे, विशाल दुट्टे, अनुराज बोदडे यांनी व मुलींमध्ये मीनाक्षी घुले (कर्णधार), पूनम मेढे जान्हवी माळी, श्रद्धा गिरी, भाग्यश्री जयकर, राजश्री पाटील प्रेरणा बोरसे यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांकाचे जेतेपद पटकावून महाविद्यालयाच्या गौरवात मानाचा तुरा खोवला. सदर दोन्ही संघांना प्रा.डॉ. प्रतिभा ढाके, तसेच सागर नानोटे, किरण लोहार यांनी मार्गदर्शन केले.

दोन्ही संघाच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अँड. रोहिणी खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस् .चौधरी, प्राचार्य डॉ.हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे