शरद पवारांच्या निवासस्थानावर हल्ला, कट कारस्थान रचणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा ; राष्ट्रवादीचेपोलीस स्टेशनला निवेदन !
भुसावळ (प्रमोद बावस्कर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यास प्रवृत्त करण्यासाठी कट कारस्थान रचणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी वरणगाव कडून पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केली.
शरद पवार यांच्या घरावर काही लोकांनी आंदोलनाच्या नावाखाली दगडफेक, चप्पल फेक करण्याचे कारस्थान केले. काल न्यायालयाने एस टी कामगारांच्या संपास संबंधित निकाल मिळताच ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून शरद पवार यांनी १२ तारखेला बारामतीत येऊन दाखवा अशी एक प्रकारे धमकी दिली. परिणामी काही समाज कंटकांनी विरोधी पक्षाच्या लोकांनी एस टी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिली व आज शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नसूनकोर्टाचे अवमान केल्यासारखे आहे. वरील भविष्यातील समाजीक परिस्थितीचे भान ठेवून यापुढे अनुसूचित प्रकार घडणार नाही या कारस्थानाचा मागे असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली.
यावेळी राजेंद्र विश्वनाथ चौधरी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाय. आर पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष समाधान चौधरी, शहर अध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेवक रवींद्र शांताराम सोनवणे, नगरसेवक पप्पू जकातदार,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष कैलास माळी, शहर अध्यक्ष इफ्तेखार मिर्झा, राजेश इंगळे, राजेश चौधरी, शेख रिजवान, नरेंद्र इंगळे, विनायक शिवरामे, शांताराम सुरळकर, महेबुब कुरेशी आदी उपस्थित होते.